मूडीज् कडून भारताची पत वाढली




पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या धडाकेबाज विकास योजनांनी आपल्या देशातील जनतेलाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पतनामांकन संस्थांनाही झपाटून टाकलंय। तब्बल 14 वर्षानंतर मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस ह्या टॉपच्या संस्थेने भारताची पत वाढवून BAA2 केलीय, जी 2004 च्या BAA3 पेक्षाही उच्च दर्जाची आहे। 

त्यामुळेच सेंसेक्स 2 दिवसात तब्बल 750 गुणांनी उसळलाय। मूडीजने इतकं जबरदस्त नामांकन दिल्यामुळे उद्योग जगतातहि उत्साह सळसळलाय। मोदींच्या पाठीवर जणू शाबासकीची थाप अन मनमोहन, चिदंबरम, यशवंत सिन्हा अन टीव्हीवर आणि संपादकीय लिहून आपल्या अकलेचे दिवाळ प्रदर्शित करणाऱ्या असंख्य मोदी द्वेष्ट्यांच्या पाठितच जोरदार रट्टा हाणलाय।

नोट बंदी, जीएसटी आणि मोदींनी राबविलेल्या अनेक सकारात्मक योजनांचं मूडीजने जोरदार स्वागत केलंय। त्यामुळ अर्थव्यवस्थेचा आता पर्यंत पोजिटीव्ह असलेला दर्जा स्टेबल ह्या उच्च श्रेणीमध्ये दाखल झालाय। मूडीजच्या पत नामांकानाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं। त्यामुळेच देशात परकीय गुंतवणूक वाढून लाखो रोजगार निर्मिती होते। त्याशिवाय देशातील उद्योगपतीही नवीन उत्साहाने आपल्या विस्तार योजना आखून रोजगार निर्मितीला हातभार लावतात। उत्पादन क्षमता वाढल्यामुळेच रोजगार वाढू शकतात। 

दुर्दैवाने मोदी विरोधक अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करताच वाट्टेल ते बरळत सुटतात त्यामुळे आर्थिक आघाडीवर ज्या प्रचंड घडामोडी घडताहेत याचा त्यांना पत्ताच नसतो। त्यामुळे कुठल्यातरी पक्षाच्या दावणीला बांधून निरर्थक वाद घालणाऱ्या अशा लोकांच्या नादी लागून आपलं मनःस्वास्थ बिघडून घेऊ नका। त्यापेक्षा अशा बातम्या लाखो लोकांपर्यंत न्या आणि मोदींच्या पाठीशी उभे राहा।

Comments