#पंजाबआणिमहाराष्ट्रसहकारीबँक:

#पंजाबआणिमहाराष्ट्रसहकारीबँक:

रिझर्व्ह बँकेने शेवटी 35A लावला. लोकं बँकेच्या दारासमोर रांगा लावून बसली आहेत.

ही बँक एक रात्रीत बुडाली का? उत्तर आहे #नाही.

खरं उत्तर आहे ते 'घोटाळे व त्यातून निर्माण होणारी बुडीत कर्जे ह्या कडे RBI ने केलेला अक्षम्य काणाडोळा.' कॉसमॉस सहकारी बँक ह्या काण्या डोळ्यांची १९९४ सालापासूनची लाभार्थी आहे. मी विचारलेल्या साधारण ₹.२,९०० कोटीच्या घोटाळे वजा बुडीत कर्जाची किती वसुली झाली ह्या बाबतीत कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे व त्यांचे साथी डॉक्टर मुकुंद अभ्यंकर, कृष्णकुमार गोयल, वगैरे अजूनही उत्तर देत नाहीत. खाजगीत म्हणतात वसुली २% पण नाही. बुडीत कर्जाची रक्कम आणखी बरीच आहे. देव न करो नाहीतर ह्या बँकेच्या बाबतीत ही 35A ची ऑर्डर एक दिवस वाचायला मिळायची. आणि बहुदा हेच टाळण्यासाठी कॉसमॉस सहकारी बँकेच्या खाजगिकरणाचा डाव आखला आहे. स्वतः च्याच गुर्मीत असलेल्या संचालक मंडळाला वाटत की खाजगिकरण केलं की सगळे घोटाळे गाडले गेले!

सहकारी बँकांमधील भ्रष्टाचार व त्यांना वर्षोनुवर्षे पाठीस घालणारे RBI चा inspection स्टाफ व संबंधित वरिष्ठ अधिकारी हेच ह्या परिस्थितीचे जनक आहेत.

35A अंतर्गत ऑर्डर पास करणारे RBI चे ED सांगू शकतील काय की बँक एका रात्रीत काशीकाय डब्यात गेली?

बँकेच्या संचालकांबरोबर रिझर्व्ह बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर पहिली कार्यवाही करा. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या शाखे बरोबर RBI च्या ED च्या ऑफिस समोर रांगा लावा.

आता पुढचा नंबर कोणत्या सहकारी बँकेचा?

@ दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

ठाणे महापालिकेचा संकल्पपूर्ती अर्थसंकल्प सादर

एम एल एम कंपन्यांची बनवाबनवी चालूच

भारताचे २०२३-२४ चे आर्थिक सर्वेक्षण