कर्जबुडव्यांचं 68 हजार कोटी कर्ज माफ ??

● एक बातमी सतत सगळीकडे फ्लॅश होते आहे - मेहूल चोकसी, रामदेव बाबांसह अनेक कर्जबुडव्यांचं 68 हजार कोटी कर्ज माफ

या मागची स्टोरी अशी की वायनाड चे खासदार राहुल गांधींनी जेव्हा संसदेत देशातल्या कर्जबुडव्या लोकांची यादी मागितलेली तेव्हा ती निर्मलाजी सीतारामन यांच्याकडून काही कारणास्तव त्यांना मिळाली नव्हती पण एका "साकेत गोखले" नामक व्यकतीने RTI फाईल करून एक माहिती मागवलेली व ती माहिती होती देशातल्या टॉप 50 कर्ज बुडवणाऱ्या लोकांची यादी. तर त्याला त्यांची लिस्ट सुद्धा मिळाली RBI कडून, त्यात स्पष्ट लिहले आहे की सदर यादी ही कर्ज "written off" केलेल्या लोकांची आहे व माफ केलेल्या लोकांची नाही.(पुरावे कमेंटबॉक्स ला)

पण आपला बिकाऊ मीडिया व देशातला मोदींद्वेषी वर्ग आपला नेहमी प्रमाणे त्या बातमीचा आधार घेऊन मोदीसरकार ला बदनाम करायला निघाला, की मोदी सरकारने देशातल्या कर्ज बुडव्यांचे कर्ज माफ केले. त्यात भली मोठी आकडेवारी दाखवली जी माहिती त्या ट्विट मध्ये होती, पण देशातल्या सर्वच लोकांना फसवणे काय मीडिया ला जमणार नाही हे माझे ठाम मत आहे. मोदीजी सत्तेत आल्यापासून प्रत्येक गोष्टीचा हिशोब एकदम कडेकोटपणे करत आलेत तर आता कस काय इतके कोट्यवधींचे कर्ज बुडवणाऱ्या लोकांना ते सहजासहजी माफ करतील? इतकंच नाही तर त्यांनी सदर भगोड्या लोकांना परत आणायला प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे, तर ते त्यांचे कर्ज कोणत्या अँगल ने माफ करतील??
जरा बेसिक कन्सेप्ट माहीत करून घेऊया - काय असतंय "Loan Written vs Loan Waived Off" ...  आपण उदाहरण घेऊन समजावून घेऊया

पुढील परिस्थितीचा विचार करा:

पुढच्या वर्षी तुम्हाला घेतलेले पैसे परत देण्याचे वचन देऊन १००० रुपये एका मित्राने तुमच्याकडून घेतले व अचानक तो देश सोडून गेला.

आपण २ - ३ वर्षांसाठी थांबता, तरीही पैशाचे कोणतेही चिन्ह नाही. आपण त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण काहीच उत्तर आले नाही. आपणास माहित आहे की आपण त्याला प्रत्यक्षात भेटल्याशिवाय परत मिळविण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे नाही, परंतु हे शक्य आहे की नाही हे आपल्याला माहित नाही.

म्हणून तुम्ही तुमच्या मनात ठरवता, आपण १००० रुपये च्या कर्ज write off करू व. तरीही आपण जेव्हा त्याला भेटेल तेव्हा ते पैशे परत घेण्याची आशा ठेऊ. त्यासाठी तुम्ही त्याच्या नातेवाईकांकडे / पोलिसांकडे / कोर्टात तक्रार देखील करतात.

हे झालं Written off बद्दल.

आतया वळूया Waive off कडे.

तथापि, समजा तो मित्र ४-५ वर्षांनी परत येईल, रडका चेहरा घेऊन तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला पैसे परत देताना त्याची अडचण स्पष्ट करेल. की मित्रा जाम चणचण आहे, लै प्रॉब्लेम आहेत,  जर आपण अतिशय श्रीमंत असाल आणि आपल्याला ते परवडेल, तर आपण त्याला ठीक आहे आणि कर्जाबद्दल चिंता करू नका आणि आपल्याकडून ते पैशे भेट म्हणून घे असा विचार करून तुम्ही ते उसनवारी दिलेले पैशे माफ कराल.

यावेळी तुम्ही जे केले ते म्हणजे कर्जमाफी.

हा लोन राइट ऑफ आणि लोन माफ करणे यातील फरक आहे.

तर आपण परत वळूया, मुद्द्याकडे... आपणाला वाटत असेल की मोदीजी अश्या चोरांना सोडतील, तर हा तुमचा भ्रम आहे आणि अश्या प्रकारच्या बातम्या पेरणारे सुद्धा एक चुकीचे वृत्त प्रसिद्ध करताय (जाणूनबुझुण किंवा अडाणीपणामुळे).

RBI ने कोणाही कर्जबुडव्या उद्योगपतिचे कर्ज माफ केलेले नाही, जी 50 जणांची यादी फिरते ती कर्जमाफीची नाही तर Prudential write off म्हणजे बैंकांना झालेले नुकसानाची आहे..  त्या उद्योगपतिनी जेवढं कर्ज बुडवलय तेव्हढी च त्यांची संपत्ती देखील  जब्त केली आहे केंद्र सरकारने...

Writes off  म्हणजे पैसे जर ह्या वर्षी घेतले आणि जर ते ह्याच वर्षी फेड नाही केले तर ते  NPA (Non performing Asset ) प्रमाणे ते या वर्षीच्या balanceshit ( ताळेबंद) मध्ये दाखवता येत नाहीत .... ते ज्यावर्षी पे करतील त्यावर्षी balanceshit मध्ये दाखवले जातात ....

म्हणजे आपल्याकडून कुणी ह्या वर्षी पैसे घेतले आणि त्याने ह्यावर्षी पे नाही केले तर आपण ते ह्या वर्षीच्या रिटर्न मध्ये दाखवत नाही ..... ते ज्या वर्षी पे होतील त्या वर्षीच्या रिटर्न मध्ये दाखवतो .....


अफवा पसरवण्याच्या अगोदर Prudential write off means writing off म्हणजे काय ?  हे माहिती करुन घ्या ...

मेहुल चोक्सी ... आणि इतर सर्वांची त्या पेक्षा जास्त संपत्ती प्रॉपर्टी जब्त केली आहे केंद्र सरकारने आणि सर्वात महत्वाचं ही कर्ज कॉंग्रेस सरकारच्या काळात बैंकांनी वाटली होती

मित्रांनो , सदर अपप्रचाराला आपले जनरल नॉलेज मजबूत करून मोडून काढुया.


Comments

Popular posts from this blog

ठाणे महापालिकेचा संकल्पपूर्ती अर्थसंकल्प सादर

एम एल एम कंपन्यांची बनवाबनवी चालूच

भारताचे २०२३-२४ चे आर्थिक सर्वेक्षण