प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
मा. पंतप्रधानांनी सन २०१५ मध्ये कमी प्रीमियमवर दोन विमा योजना जाहीर केल्या :- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) ₹ २०००००/- आणि प्रधानमंत्री
प्रीमियम खूप आकर्षक असल्याने ( ₹ १२ व ₹३६०) तुमच्यापैकी बर्याचजणांनी या योजनांची सदस्यता घेतली असेल व त्यांचे प्रीमियम आपल्या बँक खात्यातून दर वर्षीच्या ३१ मे ला वजाती पण होत असेल. याबाबत आपण कधीही बँक कडून अथवा आपल्या इन्शुरन्स कंपनी कडून पॉलिसी डॉक्युमेंट घेतले आहे का ? ९९.% धारकांनी ती घेतलेली नसणार आणि इन्शुरन्स कंपनी व बँक पण स्वतःहून देणार नाही अथवा ईमेल पण करणार नाही कारण पॉलिसी डॉक्युमेंट तयार करणे व ती पाठविण्याची cost या प्रीमियम रक्कमे पेक्षा अधिक आहे. एक जागरूक नागरिक म्हणून सदर पॉलिसी डॉक्युमेंट बँक अथवा इन्शुरन्स कंपनी कडून प्राप्त करून घेणे क्रमप्राप्त आहे. त्यांची एक प्रत १ आपल्या पॉलिसी डॉक्युमेंट सोबत सुध्दा ठेवायला पाहिजे. ती ठेवली नसल्यामुळे आपले कुटंब आपल्या निधनानंतर त्यांना त्याची कल्पना नसल्यामुळे ती क्लेम करायला विसरतात आणि इन्शुरन्स कंपनी अथवा बँक पण स्वतःहून याची कल्पना देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
आपल्या नजीकच्या लोकांना याची माहिती द्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती नजीकच्या काळात निधन पावली असल्यास त्यांचे बँक स्टेटमेंट तपासा ३१ मे रोजी पॉलिसी रक्कम वजा झाली असल्यास त्याचा माहिती घेऊन इन्शुरन्स कंपनीकडे मागोवा घ्या. पॉलिसी रक्कम प्राप्त करून घेण्याबाबत ची प्रक्रिया आपणास बँक अथवा गूगल वर प्राप्त होऊ शकते.
Covid 19 या महामारी मध्ये आपल्या जवळची व्यक्ती, शेजारी, आपल्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबास याची माहिती द्या. त्यांना या महामारीमुळे आधीच विस्कळीत झालेल्या जीवनामध्ये मा. प्रधान मंत्री यांनी सुरू केलेल्या या विमा योजनेमधून काही रक्कम मिळाल्यास त्यांच्या कुटुंबाला मदत होईल. ज्यांनी या सेवेचा उपभोग घेतला नसल्यास त्यांना या योजनेबद्दलची माहिती द्या.
सर्व बँक अधिकारी व कर्मचारी यांना पण विनंती आहे की, एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्ती निधन पावल्यास बँक खाते बंद करण्यासाठी येईल तेव्हा या योजनेचा सदस्य असल्यास त्यांच्या कुटुंबीयांना माहिती द्या. आपले एक सहकार्य त्या कुटुंबातील व्यक्तिला पुढील काळासाठी उपयोगी होऊ शकेल.
धन्यवाद !!!
कृपया सदरहू माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ...
Comments
Post a Comment