Brexit and after effects
ब्रिटनमध्ये होत असलेल्या जनमत चाचणीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला आहे. कारण मुंबई शेअर बाजार उघडताच, सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी गडगडला आहे. सेन्सेक्स काल 27002 अंकांवर बंद झाला होता, आज उघडताच तो 26367 अंकांवर जाऊन पोहोचला. दुसरीकडे पौंडनेही 31 वर्षातील निच्चांक गाठला, डॉलरच्या तुलनेत 9 टक्क्यांनी घसरला. ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, यासाठी तिथल्या नागरिंकांनी काल मतदान केलं आहे. या जनमत चाचणीचा निकाल आज आहे. हा निकाल जगाच्या राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. युरोपियन युनियनमध्ये रहावं, की नाही यावर ब्रिटनमध्ये खल सुरू आहे. ही लढाई इतकी पेटली आहे, की त्यात मजूर पक्षाच्या खासदार जोआना कॉक्स यांचा जीव गेला. त्या धक्क्यातून सावरून ब्रिटनच्या नागरिकांना आपलं भवितव्य ठरवायचं आहे. *काय आहे युरोपियन युनियन?* 28 देश आणि 50 कोटी लोकसंख्येच्या युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था 16 खर्व डॉलर्सची असून तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातला वाटा एक चतुर्थांश इतका आहे. युरोपियन युनियनमधील नागरीक सदस्य देशात व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास, व्यापार, नोकरी...