महत्वाची आणि उपयुक्त माहिती - इन्स्टंट मनी ऑर्डर (iMO)
महत्वाची आणि उपयुक्त माहिती समजा, तुम्ही बाहेरगावी गेलाय आणि तिथे तुमच्याकडे असलेली नगद रक्कम संपली तर? समजा, तुम्ही प्रवासात आहात आणि कुणीतरी तुमची पर्स चोरली तर? समजा, तुम्ही शिक्षणासाठी दुसऱ्या शहरी राहताय आणि तुम्हाला तात्काळ फी भरायची आहे. तर? समजा, दुसऱ्या गावात असताना अचानक दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली तर? समजा…. असो मंडळी! अशा अचानक संकटात सापडण्याच्या शक्यता भरपूर आहेत. पण आपण अशावेळी काय करतो? सुरुवातीला भांबावून जातो कारण जवळ काहीच पैसे नसतात. एटीएम चोरीला गेले असते. जर सोबत असेल तरी त्यांच्याही अकाउंटमध्ये गरजेइतके पैसे नसू शकतात. अनोळखी शहरात कुणी ओळखीचे नसते. मदत मागायची तरी कोणाला? आणि ओळख पाळख नसताना कुणी पैशांची मदत करेल याची शक्यता फारच कमी! या अडचणीवर एक उपाय आहे! उपाय साधा सोपा आहे आणि खात्रीचासुद्धा! अशावेळी तुम्ही सरळ पोस्ट खात्याला शरण जा. तिथं तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. तुम्ही आपल्या नातेवाईक/मित्रांकडून पैसे एका मिनिटात पोस्टात मागवू शकता आणि दुसऱ्या मिनिटाला ते त्वरित काढू शकता. ते सुद्धा पोस्टात अकाउंट नसतानाही... आश्चर्य वाटलं ना? पण हे खर...